स्मरणशक्तीसाठी हे पदार्थ ठरतात अतीघातक, लहान वयातच स्मृतीभ्रंशाचा धोका !

| Updated on: Feb 04, 2023 | 12:25 PM

आपल्या शरीरातील प्रत्येक क्रिया-प्रक्रिया करण्यात मेंदू महत्त्वाची भूमिका बजावतो. चुकीच्या आहारामुळे मेंदूचे आरोग्य बिघडते आणि तरुण वयात विस्मरणाचा त्रास होऊ शकतो, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

1 / 5
मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. शरीरातील प्रक्रिया सुरळीतपणे चालवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. अशा परिस्थितीत मनाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.  रोज खाल्लेले काही पदार्थ मेंदूला आजारी बनवण्याचे काम करतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?  त्यामुळे कमी वयातच विस्मरण होण्याचा धोका असतो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

2 / 5
रिफाइंड शुगर : साखर ही रसायनांपासून तयार केली जाते आणि तिचे अतिसेवन केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर मनासाठीही घातक आहे. अनेक संशोधनांमध्ये, साखरेचे वर्णन सायलेंट किलर म्हणूनही करण्यात येते. खूप गोड खाणे हे स्मृतिभ्रंश किंवा मेंदूशी संबंधित इतर समस्यांचे कारण ठरू शकते.

3 / 5
रिफाइंड कार्ब्स : असे काही पदार्थ आहेत जे आपल्या आहारात नियमित बनले आहेत. पण ते शरीरासाठी विषासमान आहेत. मैदा, पास्ता, कुकीजमध्ये रिफाइंड कार्ब्सचे प्रमाण जास्त असते आणि त्यांचे अतिसेवन मेंदूचे आरोग्य बिघडवण्याचे काम करते.

4 / 5
ट्रान्स फॅट : ट्रान्स फॅट हे प्रक्रिया केलेले मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि बाजारात उपलब्ध असलेल्या शुद्ध तेलामध्ये असते. याला असंतृप्त चरबी असेही म्हणतात. असे अन्न खाल्ल्याने मेंदूला सूज येऊ शकते. त्यामुळे या पदार्थांपासून शक्य तितकं लांब राहिलेलं उत्तम.

5 / 5
मद्यपान :  दारूचा आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो, हे माहीत असूनही काही लोकांना त्याचे व्यसन लागते. अल्कोहोलचा आपल्या यकृत आणि पोटावर वाईट परिणाम तर होतोच पण त्यामुळे मेंदूचा व्हॉल्यूमही कमी होतो. जर तुम्हाला मद्यपानाचे व्यसन असेल तर त्याचे सेवन हळूहळू कमी करणे इष्ट ठरते.