डोळे हा आपल्या शरीरातील महत्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे. त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आसपासच्या अनेक पदार्थांचा योग्य वापर केला पाहिजे.
सिमला मिरची - यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यात गुणकारी ठरते.
कोरफड - डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफडीच्या रसाने डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागात मसाज करावा.
बटाटा - बटाट्याचा वापर तुम्ही डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी करू शकता. बटाट्याच्या चकत्या करून तुम्ही त्या डोळ्यांवर ठेऊ शकता. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
सीफूड - व्हिटॅमिन बी 12 ने भरपूर असलेले सीफूड हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. यामुळे दृष्टी चांगली होते.