IPL मध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू, विराट आणि धोनीसह या विदेशी खेळाडूचा समावेश
आयपीएलचे आतापर्यंत 15 सीझन झाले असून 16 सीझन सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आतापर्यंतच्या पर्वात एमएस धोनी आणि विराट कोहली दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
1 / 8
आयपीएल 2023 स्पर्धेसाठी 10 संघ सज्ज आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स पहिलंवहिलं जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई 5, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं 4 वेळा जेतेपद पटकावलं आहे.
2 / 8
रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमध्ये नावलौकिक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करण्याच्या यादीत रोहित शर्मा आघाडीवर आहे.
3 / 8
आयपीएलच्या आतापर्यंतच्या सर्व सिझनची सॅलरी एकत्र केली तर रोहित शर्माचं नाव आघाडीवर येतं. त्याने मुंबईला पाच वेळा किताब जिंकून दिला आहे.
4 / 8
रोहित शर्मानंतर नाव येते ते महेंद्रसिंह धोनीचं. त्याने चेन्नई सुपर किंग्सला चारवेळा जेतेपद पटकावून दिलं आहे.
5 / 8
विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळताना विराट कोहलीने सर्वाधिक कमाई केली आहे.
6 / 8
सुरेश रैनाने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. 2021 पर्यंत सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला.सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.
7 / 8
चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोच्चि टस्कर्ससाठी जडेजा खेळला आहे. जडेजाने 2008 पासून आतापर्यंत 109 कोटींची कमाई केली आहे.
8 / 8
सुनील नरेन या यादीत सहाव्या स्थानावर आहे. 2012 मध्ये कोलकाता नाईट राईडर्समध्ये खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आयपीएलच्या 11 पर्वात 107.24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई करणारा विदेशी खेळाडू ठरला आहे.