ही वनस्पती म्हणजे सापांना निमंत्रणच, तुमच्या घरात तर नाहीना?

| Updated on: Nov 17, 2024 | 5:47 PM

सापाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये आढळणाऱ्या सांपामध्ये केवळ दहा ते पंधरा टक्के सापांच्या जातीच या विषारी आहेत.

1 / 7
सापाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. जसं की प्रत्येक साप हा विषारीच असतो, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये आढळणाऱ्या सांपामध्ये केवळ दहा ते पंधरा टक्के सापांच्या जातीच या विषारी आहेत.बाकी नव्वद टक्के साप हे बिनविषारी आहेत.

2 / 7
भारतामध्ये जे साप आढळतात त्यातील मुख्य चार जाती या विषारी आहेत. त्यामध्ये फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग या चार जातींचा समावेश होतो. यातील नाग जातीचा साप हा त्याच्या फण्यामुळे सहज ओळखला जातो.

3 / 7
सापांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. कारण सापांचा वावर हा सामान्यपणे शेती आणि जंगलांमध्ये आढळतो. सापांचं मुख्य अन्न हे उंदीर आहे, दरवर्षी उंदीर मोठ्या प्रमाणात अन्न-धान्याची नासाडी करतात.त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. साप या उंदरांना खाऊन शेतकऱ्यांची एकप्रकारे मदतच करतो.

4 / 7
एक लक्षात घ्या साप कधीही स्वत:हून हल्ला करत नाही, त्याला धोका जाणवला तरच तो हल्ला करतो. जर साप चावला आणि योग्य उपचार तातडीनं मिळाले तर तो व्यक्ती पूर्णपणे बरा होता.

5 / 7
साप चावण्याचं प्रमाण हे पावसाळ्यात जास्त असतं.कारण पावसाळ्यात सापाच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यानंतर ते जमिनीवर येतात, अशा स्थितीमध्ये साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होते.

6 / 7
चंदनाचं झाड तुमच्या आसपास असेल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असं मानतात की चंदनाची सावली ही डेरेदार असते, चंदन मुळातच शितल असते. उन्हाळ्यामध्ये गरमीपासून बचावासाठी साप या झाडांचा आश्रय घेतात.

7 / 7
आणखी दुसरं एक महत्त्वाचं झाडं म्हणजे बांबू, बांबूच्या झाडाचा घेर हा मोठा असतो. तीथे अडचण असल्यामुळे सापांना लपण्यासाठी सहज जागा उपलब्ध होते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी बांबू असतात तिथली जमीन भुसभुशीत असते त्यामुळे सापांना इथे सहज बीळ बनवनं सोपं होतं. त्यामुळे या ठिकाणी देखील अनेकदा साप आढळून येतात.