वजन घटवण्यासंदर्भातील या गैरसमजुतींमुळे तुम्ही पडाल आजारी…
वाढलेलं वजन किंवा लठ्ठपणा यामुळे शरीरात मधुमेह, हाय बीपी यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे लोकं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण वेट लॉसशी संबंधित काही चुकीच्या समजुतींमुळे बारीक होण्याऐवजी तुम्ही आजारी पडू शकता, हे माहीत आहे का ?
1 / 6
वजन कमी करण्यासाठी अनेक युक्त्या किंवा पद्धती वापरल्या जातात. ही एक चांगली सवय आहे पण काही गैरसमजांमुळे वजन तर कमी होतं नाही, पण आपण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. कसे ते जाणून घेऊया. ( Photos : Freepik)
2 / 6
वजन वाढण्याचे तोटे : आपले वजन झपाट्याने वाढल्यास लठ्ठपणाचा धोका उद्भवतो. वाढलेल्या वजनामुळे शरीरात हाय बीपी, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अनेक लोकांना तरूण वयातच हा त्रास होतो.
3 / 6
वेट लॉस मिथ : वजन कमी करण्यात व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतो असं अनेकांना वाटतं आणि ते डाएटकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. पण असं केल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते आहार आणि व्यायाम यामध्ये समतोल असायला हवा.
4 / 6
कार्ब्स न खाणं : वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याची चूक करतात. पण त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. परिणामी चक्कर येण्याचा त्रास किंवा अशक्तपणा येऊ शकतो.
5 / 6
खाणं बंद करणं : ज्यांना वजन कमी करायचं आहे, ते बहुतेक लोक जलद परिणामांसाठी जेवण बंद करण्याची चूक करतात. पण असे केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्याचे अनेक गंभीर तोटे होतात.
6 / 6
सप्लीमेंट्सचे सेवन: पटापट वजन कमी करण्यासाठी काही लोकं सप्लीमेंट्सचे सेवन करण्याची चूक करतात. त्याचे अनेक तोटे नंतर दिसू लागतात.