सध्या सोशल मीडियाच्या जगात अनेक बऱ्या-वाईट गोष्टी शेअर केल्या जातात, अशात काही फोटो आयुष्याची शिकवण देऊन जाणारेसुद्धा असतात.
या फोटोमध्ये पत्नीसोबत भाजीपाला खरेदी करणारे हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर (आयएएस).
आपल्या कर्तृत्वानं 'खास' बनल्यानंतरही 'आम' राहण्यात माणसांची खरी कसोटी असते.
कितीही मोठं पद असलं तरी साधेपणा कसा टिकवला जाऊ शकतो हे या फोटोंमधून शिकण्यासारखं आहे.
नोकरी, पैसा आणि पद हे ऑफिसच्या पायरीपर्यंत मर्यादित ठेवत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आयुष्य जगत आहेत हे या फोटोंमधून दिसते.