राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरळी येथील जांबोरी मैदानातील भव्य दहीहंडी फोडण्यात आली.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा क्रम सुरू झाला आहे. आम्ही सुद्धा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असं देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर महाराष्ट्राच्या सर्वगीण विकासाची दहीहंडी फोडत जन्माष्टमीच्या सर्वांनां शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष शेलार , प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते.
यावर्षी गोविंदा पथकांना आता खेळाडूंचा दर्जा दिला आहे, तुम्ही खेळाडू म्हणून पुढे येत आहेत
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये तुम्हा आरक्षण दिले जाणारा आहे, एवढंच नव्हे तर जखमी गोविंदावर मोफत उपचार होणार आहेत असे ही ते म्हणाले आहेत.