World Cup 2023 : भारताच्या या खेळाडूंचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप, जाणून घ्या त्यांच्याबाबत

| Updated on: Oct 05, 2023 | 3:05 PM

ODI World Cup : वनडे वर्ल्डकप स्पर्धेची थोड्याच तासात रंगत चढणार आहे. नवे विक्रम आणि नवा विजेता मिळणार आहे. जेतेपदासाठी दहा संघांमध्ये चुरस आहे. दुबळे समजले जाणारे संघही दिग्गज संघांचं गणित बिघडू शकतात. टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.

1 / 5
वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन भारतात आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. पण टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंसाठी ही शेवटची स्पर्धा असणार आहे.

2 / 5
रोहित शर्मा याचं वय 36 वर्षे आहे. त्याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व असून त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. हा वनडे वर्ल्डकप रोहित शर्मासाठी शेवटचा असणार आहे. आधीच टी20 क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा खेळत नाही. दुसरीकडे, 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळायचं असेल तर सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करावी लागेल.

3 / 5
आर. अश्विन तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. 2011, 2015 आणि आताच्या वर्ल्डकप स्पर्धेत आर अश्विन खेळणार आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये त्याला स्थान मिळालं नव्हतं. मात्र अक्षर पटेल जखमी असल्याने आर अश्विनला संधी मिळाली आहे. अश्विन 37 वर्षांचा असून हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे.

4 / 5
विराट कोहलीचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. विराट कोहलीचं वय 35 वर्षे आहे. आतापर्यंत तीन विश्वचषकात विराट कोहली खेळला असून यंदाचं चौथं पर्व आहे. त्यामुळे 2027 वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. पुढे फक्त कसोटी संघात खेळण्याची शक्यता आहे.

5 / 5
वर्ल्डकपसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.