PHOTO | हा आहे सर्वात दुर्मिळ रक्त गट ! जगभरात फक्त 43 लोकांचा आहे हा ग्रुप
गोल्डन ब्लड ग्रुपचे नाव ऐकून एखाद्याला मौल्यवान काहीतरी असल्यासारखे वाटेल. हा रक्ताचा एक दुर्मिळ गट आहे जो जगात फारच कमी आहे. ज्या रक्तगटास सोन्याचे रक्त म्हणतात, त्याचे खरे नाव आरएच नल((Rh null)) आहे. (This is the rarest blood group, This group of only 43 people worldwide)
-
-
आपण ए, बी, ओ, एबी निगेटिव्ह-पॉझिटिव्ह रक्तगटाबद्दल वाचले असेल आणि ऐकले असेल, परंतु आपणास माहित आहे की जगभरातील फारच थोड्या लोकांमध्ये आणखी एक रक्तगट आढळतो. वास्तविक आपण ज्या रक्तगटाविषयी बोलत आहोत. त्याला जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट मानले जाते.
-
-
गोल्डन ब्लडचे मूळ नाव आरएच नल(Rh null) आहे. हे अत्यंत दुर्मिळ असल्याने संशोधन करणार्या वैज्ञानिकांनी त्याचे नाव गोल्डन ब्लड ठेवले आहे. रेयरेस्ट असल्याने आणि कोणत्याही रक्तगटाला ते देऊ शकत असल्याने हे रक्तगट मौल्यवान आहे.
-
-
सर्व प्रकारच्या रक्तांमध्ये याला ‘गोल्डन ब्लड’ म्हणतात. तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे अँटीजन सापडत नाही. म्हणजे, हे रक्त कोणत्याही रक्तगटाला दिल्यास, शरीर ते स्वीकारते.
-
-
युएस दुर्मिळ आजार माहिती केंद्राच्या म्हणण्यानुसार, गोल्डन ब्लड ग्रुप अँटिजन रहित असल्याने, ज्या लोकांच्या शरीरात हे रक्त आहे त्यांना अशक्तपणाची तक्रार असू शकते. हेच कारण आहे की अशा लोकांची माहिती होताच डॉक्टर त्यांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा आणि लोहयुक्त वस्तूंचा आहारात अधिक समावेश करण्याचा सल्ला देतात.
-
-
एका संशोधनानुसार आतापर्यंत ते केवळ 43 लोकांमध्ये हा रक्तगट आढळला आहे. यामध्ये ब्राझिल, कोलंबिया, जपान, आयर्लंड आणि अमेरिकेतील लोकांचा समावेश आहे. दुर्मिळ असल्यामुळे आणि सेम रक्तगटाचीच आवश्यकता असल्याने डॉक्टर या लोकांना सतत रक्तदान करण्यास प्रोत्साहित करीत असतात. जेणेकरून आवश्यकतेनुसार हे रक्त त्यांच्यासाठी वापरता येईल.