कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, देशातील कोरोनाबाधित रुगणांची संख्या 9 हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला.
मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. तसेच गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी झाली. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता ही गर्दी धोकादायक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर वांद्रे स्थानकाबाहेर बिहारी आणि बंगाली कामगार मोठ्या प्रमाणात जमले. वांद्रे स्थानकाबाहेर हे लोक लॉकडाऊन वाढीचा निषेध करत आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकात अडकून पडलेले परप्रांतीय कामगार जे बंगाली स्पीकर्स आणि बिहारी राज्यात जाण्यास आलेले आहेत, ते सर्वजण रस्त्यावर आले आहेत.
3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्याचा ते निषेध करत आहेत. रेल्वे सुरु करावा, जेणेकरुन ते त्यांचे मूळगावी जाऊ शकतील, अशी मागणी या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी केली आहे.
या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार आणि जीवनावश्यक वस्तूही मिळणे कठीण झालं आहे. बांद्रा पोलीस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.