Marathi News Photo gallery Three failed marriages, offspring, Angelina Jolie's astonishing journey to a successful career in Hollywood; Read detailed
Angelina Jolie: तीन अयशस्वी लग्न, अपत्य, हॉलीवूडमधील यशस्वी करिअर अँजेलिना जोलीचा थक्क करणारा प्रवास ; वाचा सविस्तर
ऑस्कर जिंकल्यानंतर अँजेलिना एका मुलाखतीत म्हणाली, 'माझा भाऊ जेम्स हेवन मला आवडतो.' या विधानाच्या जवळपास तीन महिन्यांनंतर, गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ती तिच्या भावासोबत बॅकस्टेजमध्ये लिप-लॉक करताना दिसली होती. त्यावेळी ती वादग्रस्त ठरली होती.
1 / 9
हॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अँजेलिना जोली आहे हॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रीमधील एक आहे. अँजेलिना आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे
2 / 9
लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेल्या अँजेलिनाचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. अवघ्या एका वर्षाच्या लहान वयात अँजेलिनाच्या पालकांचा घटस्फोट झाला होता.त्यानंतर तिचे आणि तिच्या भावाचे संगोपन त्यांच्या आईने केले.
3 / 9
बालपणात खूप त्रास सहन केल्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी तिने फॅशन मॉडेल, अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने 1982 मध्ये तिचे वडील जॉन वोइट यांच्यासोबत लूकिंग टू गेट आउट या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
4 / 9
बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अत्यंत कमी बजेटच्या 'सायबोर्ग-2' या चित्रपटातून झाली. अँजेलिनाने आयुष्यात तीन लग्न केले पण एकही यशस्वी झाला नाही. तरुण वयात लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अँजेलिनाचे वादांशी जुने नाते आहे.
5 / 9
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अँजेलिनाने वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत सर्व प्रकारची ड्रग्ज घेतल्याचे सांगितले जाते. 'माझा पहिला नवरा जॉनी ली मिलरने माझी ड्रग्जच्या व्यसनातून मुक्ती मिळवली' असे सांगून खुद्द अँजेलिनानेच याचा खुलासा केला होता.
6 / 9
ऑस्कर जिंकल्यानंतर अँजेलिना एका मुलाखतीत म्हणाली, 'माझा भाऊ जेम्स हेवन मला आवडतो.' या विधानाच्या जवळपास तीन महिन्यांनंतर, गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ती तिच्या भावासोबत बॅकस्टेजमध्ये लिप-लॉक करताना दिसली होती. त्यावेळी टी वादग्रस्त ठरली होती.
7 / 9
1996 मध्ये अँजेलिनाने अभिनेता जॉनी ली मिलरशी पहिले लग्न केले. या दोघांनी 'हॅकर' चित्रपटात एकत्र काम केले होते. लग्नात अँजेलिनाने काळी रबर पॅंट आणि पांढरा शर्ट घातला होता, ज्यावर तिने जॉनीचे नाव तिच्या रक्ताने लिहिले होते.
8 / 9
तिच्या या लग्नाच्या पोशाखाने चांगलीच दहशत निर्माण केली होती. पण वर्षभरानंतर दोघे वेगळे झाले.त्यानंतर 2005 च्या सुरुवातीस, अँजेलिनावर ब्रॅड पिट आणि जेनिफर अॅनिस्टन यांच्या घटस्फोटास कारणीभूत ठरल्याचा आरोप होता. मात्र तिने या आरोप नाकारले.
9 / 9
अँजेलिनाने अनेकवेळा त्यास नकार दिला. पण त्याचवेळी तिने हेही कबूल केले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती पिटच्या प्रेमात पडली होती. 2006 मध्ये अँजेलिनाने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ब्रॅड पिट आणि त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.