Holi | आपुलकीचा कोकणातलो शिमगो ! अवसरांवर दगड मारण्याची प्रथा, देवी भावईच्या साक्षीने हुडोत्सव साजरा

| Updated on: Mar 24, 2022 | 8:46 AM

या हुडोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा कर्नाटकमधून मोठया संख्येने भाविक हजेरी लावतात. कोकणातल्या या हुडोत्सवाची गोष्टच वेगळी असते. अवसरांवर दगड मारण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक लोकांनी यावर्षी देखील उपस्थिती दाखवली.

1 / 5
पारंपरिक लोककला व संस्कृती आणि धार्मिक प्रथा- परंपरा वैशिष्ट्यपूर्णरित्या जोपासत कोकणात मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा होतो. कोकणातील गावोगावी या अशा अनोख्या परंपरा खास शिमगोत्सवात पाहायला मिळतात.

2 / 5
कोकणात शिमगा आणि गणपतीला या साणांना चाकरमानी गावाला नक्की जातात. याच पार्श्वभूमीवर कुणकेरीचा प्रसिध्द हुडोत्सव आज संपन्न झाला.होळीवर चढणाऱ्या अवसरांवर दगड मारण्यासाठी हा हुडोत्सव प्रसिध्द आहे.

3 / 5
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरीच्या हुडोत्सवाला प्रारंभ झाला. दिवसभर देवी भावईच्या घरात नवस फेडणे,बोलणे ओटी भरण्यासाठी स्थानिकांसह गोवा,कर्नाटकातील भाविक आले होते. सायंकाळी 7 वाजता 85 फुटी हुड्यावर चढलेल्या अवसरांवर दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला.

4 / 5
 या हुडोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अवसर सरसर होळीवर चढतात,या चढणाऱ्या अवसरांवर जमलेले भाविक खालून दगड मारत असतात. ही खूप वर्षे जुनी असलेली प्रथा आजही त्याच उत्साहात पार पडते.वैशिष्ट्य म्हणजे मारलेल्या या दगडांपासून कोणतीही इजा होत नाही.

5 / 5