Holi 2023 : केमिकलयुक्त रंगापासून त्वचेचे करायचे आहे संरक्षण ? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
होळीनिमित्त रंग खेळण्यासाठी अनेक जण खूप उत्सुक असतात. पण केमिकलयुक्त रंगांच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. या छोट्या पण महत्वपूर्ण टिप्सच्या मदतीने तुम्ही त्वचेची नाट काळजी घेत होळीचा आणि रंगांचा आनंद लुटू शकाल.
1 / 7
बहुतेक लोक होळीबद्दल आणि रंग खेळण्यासाठी उत्साही असतात. मात्र, बाजारात उपलब्ध रंगांच्या वापरामुळे त्वचेच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. रंगांमध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेवर ॲलर्जी येणे, रॅशेस, खाज सुटणे आणि इन्फेक्शन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी तुम्हालाकेमिकल आधारित रंगांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करायचे असेल, तर काही सोप्या टिप्स फॉलो करा.
2 / 7
त्वचेला लावा तेल : होळी खेळण्यापूर्वी त्वचेवर तेलाने मसाज केल्याने तुम्ही केमिकल त्वचेत जाण्यापासून रोखू शकता. अशावेळी रंग लावण्याच्या 1 तास आधी त्वचेवर खोबरेल तेल लावा. तसेच केसांना मोहरीचे तेल लावा. त्याचबरोबर बोटं आणि नखांभोवती तेल लावायला विसरू नका. यामुळे तुमची त्वचा पूर्णपणे सुरक्षित राहील.
3 / 7
सनस्क्रीनचा करा वापर : उन्हात होळी खेळल्याने त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्न होण्याचा धोका असतो. अशावेळी त्वचेला तेल लावल्यानंतर सनस्क्रीन वापरा, ज्यामुळे तुम्ही सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचा काही वेळ सुरक्षित ठेवू शकता.
4 / 7
नेलपॉलिश लावावे : होळीचे रंग नखांनाही हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत होळी खेळण्यापूर्वी नखांवर गडद रंगाचे नेलपेंट लावू शकता. तसेच, नेल पेंटचा जाड कोट लावून तुम्ही तुमच्या नखांचे संरक्षण करू शकता.
5 / 7
गॉगल वापरायला विसरू नका : होळी खेळताना अनेक वेळा डोळ्यात रंग जातो. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज सुटणे आणि ॲलर्जी होण्याचा धोका असतो. अशावेळी होळी खेळताना सनग्लासेस लावा. त्याचबरोबर डोळ्यांना रंग लागल्यास डोळे लगेच थंड पाण्याने धुवावेत.
6 / 7
हर्बल रंग वापरा : होळी खेळताना तुम्ही सिंथेटिक रंगांचा वापर टाळू शकता. अशा परिस्थितीत होळीची खरेदी करताना हर्बल रंग खरेदी करण्यावर भर द्या. किंवा तुम्ही घरीही नैसर्गिक रंग तयार करू शकता.
7 / 7
ओले कपडे लगेच बदला : होळीच्या दिवशी लोक तासन्तास ओल्या कपड्यातच असतात. त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. अशा परिस्थितीत कोरडी होळी खेळणे चांगले. तसेच कपडे ओले झाले तर ते ताबडतोब बदलावे, यामुळे तुम्ही आजारी पडणे टाळू शकता.