चीनमध्ये कोरोनाचा कहर पुन्हा वाढल्याने संपूर्ण जग हाय अलर्टवर आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. नारळाचे अथवा शहाळ्याचे पाणी पिणं हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. विविध पद्धतीने तुम्ही शहाळ्याचे पाणी पिऊ शकता.
दररोज नारळाच्या पाण्यात चिया सीड्स आणि ड्रायफ्रुट्स भिजवावेत. सकाळी उठल्यावर चमच्याने हे सुपरफूड चमच्याने खाऊ शकता आणि उरलेले नारळाचे पाणी पिऊ शकता.
नारळाच्या पाण्याची स्मूदी तयार करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये चिया सीड्स, अक्रोड आणि इतर ड्रायफ्रुट्स घालू शकता. सकाळी नारळाचे पाणी घालून हे सर्व मिश्रण मिक्समधून फिरवून घ्या, हवे असल्यास चवीपुरते थोडे मीठ घालावे. यामुळे तुम्ही आतून तंदुरुस्त रहाल.
नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळूनही तुम्ही पिऊ शकता. लिंबू हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात व्हिटॅमिन सीची भूमिका महत्त्वाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
तुम्हाला नारळाचे पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही त्याचे दूध काढूनही सेवन करू शकता. त्यात कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज कमी असतात. याशिवाय नारळाचे दूध प्यायल्याने शरीरात मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस आणि पोटॅशिअम या पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते.