साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांचे म्हणजेच बत्तांसांच्या हाराचे मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे.
साखर आणि मजूरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे.

राजेंद्र कटकमवार यांचा तीन पिढ्यांपासून साखर गाठी तयार करण्याचा व्यवसाय आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायातून दरवर्षी मोठी उलाढाल होते.या वर्षी त्यांनी 35 क्विंटल साखरे पासून हार तयार केले आहेत.सध्या 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.