VIRAR RAIN UPDATE : विरारमध्ये मुसळधार पाऊस, स्टेशन रोड पाण्याखाली…
महेश घोलप |
Updated on: Jul 20, 2023 | 11:42 AM
मागच्या 10 वर्षांपासून पावसाळ्यात अशीच परिस्थिती असल्याने नागरिक संताप व्यक्त करित आहेत. विरारचा आगाशी रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून गुडघा ते कंबरे इतके पाणी रस्त्यावर साचलेले आहे.
1 / 5
विरार पश्चिम आगाशी ते स्टेशन रोड पाण्याखाली गेला आहे. आगाशी, बोलींज, विराट नगर, पुरा पाडा या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. घरात पाणी, रस्त्यावर पाणी सर्वत्र पाणीच झालं आहे. नागरिक 2 किलोमीटर पायी चालून घर गाठतं आहेत.
2 / 5
मागच्या 10 वर्षांपासून पावसाळ्यात अशीच परिस्थिती असल्याने नागरिक संताप व्यक्त करित आहेत. विरारचा आगाशी रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून गुडघा ते कंबरे इतके पाणी रस्त्यावर साचलेले आहे.
3 / 5
रस्त्यावरून कोणतीच वाहन बाहेर निघू शकत नसल्याने कामावर जाणारे नागरिक पायी चालून प्रवास करीत आहेत.
4 / 5
वसई विरार भागामध्ये अतिवृष्टी चालू असल्यामुळे बऱ्याच भागात पावसाचे पाणी भरले आहे. महावितरण कंपनीकडून खबरदारीचा उपाय योजना म्हणून 11 DTCs, काही फिडर पिलर्स, दिस्ट्रिब्युशन बॉक्सेस बंद करण्यात आले आहेत.
5 / 5
पावसाचा जोर कमी झाल्यास तातडीने सदर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, होत असलेल्या गैरसोयी बद्दल दिलगीर आहोत. आपणास विनंती करण्यात येते पावसामध्ये लाईव्ह नेटवर्क (केबल्स, वायर्स) यांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. धोकादायक असलेल्या परिस्थीची माहिती त्वरित मोबाईल किंवा मेसेजद्वारे 7875760602 क्रमांकावर द्यावी अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.