बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजार भाव घसरला. टोमॅटोला केवळ अडीच रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मागील तीन महिन्यापासून टोमॅटोच्या बाजारभावात सतत घसरण सुरू असून त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवारात सध्या टोमॅटोला प्रतवारीनुसार टोमॅटोला प्रति वीस किलोच्या क्रेटला फक्त 50 रुपये ते 140 रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच प्रति किलो अडीच रुपये ते सात रुपये इतका कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.
शेतकर्यांचा टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे टोमॅटो पिकासाठी शेतकर्यांनी केलेला भांडवली खर्च शेतकर्यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचा दर वधारले होते. शेतकऱ्यांना शेतात सीसीटीव्ही लावावे लागले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना लाखोचा फायदा झाला होता.
पण यंदा जानेवारी महिन्यापासून अद्याप टोमॅटोला चांगला भाव मिळालेला नाही. टोमॅटोची लाली कमी झाली आहे.