आधुनिक तंत्रज्ञासह सुसज्ज असे टॉप 10 स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहेत वैशिष्टे
प्रत्येकाला असा स्मार्टफोन हवा असतो जो स्टायलिश, शक्तिशाली हार्डवेअर, चांगला कॅमेरा आणि काही चांगल्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल. आज आम्ही तुम्हाला अशा दहा टॉपचे स्मार्टफोनची माहिती देणार आहोत जे तुम्ही या वर्षी खरेदी करू शकता. (Top 10 smartphones equipped with modern technology)
1 / 10
मोटोरोला Edge S:फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 870 सह येणारा हा पहिला फोन आहे. फोन वायफाय 6, ब्लूटूथ 5.1 ला सपोर्ट करतो. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचचे 21: 9 अल्ट्रा वाईड एलसीडी स्क्रीन दिले आहे. फोनमध्ये 16 आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट आणि 64, 16 आणि 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून 5000mAh बॅटरी बॅकअप दिले आहे. फोनची किंमत 22,590 रुपये आहे.
2 / 10
वनप्लस नॉर्ड N10:फोनमध्ये 6.49 इंचाचा आयपीएस एलसीडी पॅनेल आहे जो 1080 × 2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सह येतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 690 एसओसी आहे. स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि 64 एमपी प्राइमरी सेन्सर, 8 एमपी अल्ट्रा वाईड, 2 एमपी डेप्थ आणि 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4300mAh बॅटरी बॅक अप मिळेल. या फोनची किंमत 28,790 रुपये आहे.
3 / 10
रेडमी नोट 10 : हा फोन 4 मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. हा फोन 5G असून यात स्नॅपड्रॅगन 750G चिप देण्यात आली आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि IP52 वॉटर आणि डस्ट रसिस्टेंट मिळेल. बॅटरी बॅकअप 5050mAh असून 100 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
4 / 10
शाओमी MI 11 लाईट : हा फोन अद्याप लाँच केलेला नाही. हँडसेटमध्ये 120 हर्ट्जची एलसीडी फुल स्क्रीन असेल. फोनमध्ये 4250mAh बॅटरी दिली जाईल. तर फोनचा प्रोसेसर 775G असेल. फोनचा मेन कॅमेरा 64 मेगापिक्सल असेल, त्यासोबतच 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनची किंमत 31,999 रुपये आहे.
5 / 10
सॅमसंग गॅलेक्सी A52:हा फोन अपकमिंग असून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750 जी चीप देण्यात आली आहे. यात आपल्याला 6.5 इंचाची एमोलेड स्क्रीन दिली जाईल. फोनची बॅटरी 4500mAh असेल. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात आपल्याला 64 मेगापिक्सल, 12 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा मिळेल, तर 32 मेगापिक्सल वाईड एंगल कॅमेरा असेल. हा फोन 128 आणि 256 जीबी स्टोरेजसह येईल. फोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
6 / 10
रियलमी नार्जो 30 प्रो : हा फोनही अद्.ाप लाँच करण्यात आला नाही. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800U 5G चिपसेट देण्यात येईल. डिव्हाईसमध्ये 6.5 इंचाचे पंच होल एलसीडी डिस्प्ले असेल जे 90 हर्ट्जच्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनची किंमत 13,999 रुपये असू शकते.
7 / 10
गुगल पिक्सल 5A:फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732 जी किंवा 690 5 जी दिले जाऊ शकते. फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. फोनची बॅटरी 4080mAh असू शकते. आतापर्यंत फोनबद्दल अशीच माहिती समोर आली आहे. फोनची किंमत 34,999 रुपये असू शकते.
8 / 10
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 : फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल HD+ सुपर अमोलेड प्लस इन्फिनिटी ओ डिस्प्ले असेल. फोनला Exynos 990 7nm EUV प्रोसेसर दिला जाईल जे ARM Mali G77MP11 GPU सह येईल. फोनमध्ये 12 मेगापिक्सल, 64 मेगापिक्सल, 12मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात येणार आहे, तर 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल.फोनची बॅटरी 4300mAh असेल. फोनची किंमत 77,999 रुपये असू शकते.
9 / 10
आईफोन SE प्लस : फोनची अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु या फोनमध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तर फोनचा कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा असेल. फोनची किंमत 36,490 रुपये असू शकते.
10 / 10
हुवावे नोवा 8 : फोनचे एक नवीन मॉडेल लवकरच बाजारात येऊ शकते. या फोनमध्ये 6.57 इंचाचा FHD+ रेझोल्यूशन दिला जाऊ शकतो. फोनला 90Hz चा रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Kirin 985 5G SoC वर काम करेल. फोनमध्ये 64 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स दिले जाऊ शकतात. हा फोन 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरासह येईल.