कसोटी संघाचा कर्णधार असताना कोहलीने 7 द्विशतके केली असून तो मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेक कॅप्टन आहे.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने 4 हजार धावांचा आकडा पार केला आहे. विराटच्या नावावर 115 टी-20 सामन्यांमध्ये 53.73 च्या सरासरीने 4008 धावा आहेत.
विराट कोहली वन डे मध्ये सर्वाधिक करण्याच्या यादीमध्ये 13525 धावांसह चौथ्या स्थानी आहे.
विराट कोहली वन डेमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत 48 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन संघांविरुद्ध 9 किंवा त्याहून अधिक शतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध 10 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 9 शतके झळकावली आहेत.
विराट कोहलीने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 558 धावा केल्या होत्या. एका मालिकेमध्ये एका फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.