भरपावसात सौताडाला गेला नसाल तर पिकनिकला अर्थच नाही; महाराष्ट्रात कुठे आहे हा स्पॉट?
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थस्थळ बीड जिल्ह्यातील सौताडा येथे आहे. निसर्गरम्य ठिकाण म्हणून सौताडा येथील रामेश्वर धबधबा खूप चर्चेत असतो.
1 / 5
बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून सौताडा येथील रामेश्वर धबधबा खूप चर्चेत असतो. तीनशे फुटाहूनही जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत असते.
2 / 5
सौताडामधील हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या धबधब्याचे मनमोहक आणि विहंगम दृश्य नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असते
3 / 5
पाचशे फूट खोल दरीत श्रीक्षेत्र रामेश्वर तीर्थस्थळ असून येथील धबधब्याचा आवाज सकाळी दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला येतो. गावात भूकंपासारखे हादरे देखील ऐकू येतात.
4 / 5
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थस्थळ सौताडा जामखेडपासून अकरा किलोमीटर, अहमदनगरपासून नव्वद किलोमीटर तर बीडपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे.
5 / 5
बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात धबधब्याचे निसर्गरम्य व विहंगम चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत असते