प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला.
ट्रॅक्टर मार्च दरम्यान अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक पाहायला मिळालं.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
मुकरबा चौकातही परिस्थिती नियमंत्रणाबाहेर गेली आहे. टिकी बॉर्डरवर नांगलोई येथे पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना 12 वाजता रॅली काढण्याची परवानगी देण्यात आलेली होती. पण त्याआधीच शेतकऱ्यांनी रॅलीला सुरुवात केली. ही रॅली रोखण्यात पोलिसांना अपयश आले. एवढेच नव्हे तर आंदोलक शेतकरी शेतकरी नेत्यांचंही काहीही ऐकत नसल्याचं चित्रं आहे.