आता SIM पोर्ट करताना जादा वाट पहावी लागणार नाही, 1 जुलैपासून नियमात हा बदल

| Updated on: Jun 29, 2024 | 10:40 PM

SIM Port Rules : आपल्या मोबाईल नंबरला एका कंपनीकडून दुसऱ्या सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनीत बदलण्याला सिम पोर्टेबिलिटी म्हणतात. आता भारतात आपल्या मोबाईल नंबरला कायम ठेवत कंपनी बदलण्याचे काम सोपे होणार आहे. चला तर पाहूयात किती दिवसांत आता मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सेवा किती दिवसात मिळणार आहेत ते पाहूयात

1 / 5
देशात 1 जुलै 2024 पासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी  नियमात बदल झाला आहे.  आता मोबाईल नंबर कायम ठेवून कंपनीला केवळ 7 दिवसात बदलता येणार आहे असे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने म्हटले आहे. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी पूर्वी 10 दिवसांची वाट पाहावी लागत होती. आता हा नियम बदलण्यात आला आहे.

2 / 5
तुमचा मोबाईल क्रमांकाला एका टेलिकॉम कंपनीकडून दुसऱ्या कंपनीत बदलण्याच्या प्रक्रियेला सिम पोर्टिंग म्हणतात. सिम स्वॅप घोटाळ्यांना टाळण्यासाठी सिम पोर्ट होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वी हा कालावधी 10 दिवसांचा होता, तो आता 7 दिवसांचा करण्यात आला आहे.

3 / 5
सिम स्वॅप घोटाळे करणारे स्कॅमर फिशिंगद्वारे लोकांचा डाटा चोरतात. फिशिंग घोटाळ्याच लोकांना फसविणारे ईमेल किंवा संदेश पाठवले जातात. हे संदेश कंपनी किंवा बँकेच्या नावाने पाठवले जाऊ शकतात. यामध्ये अशा लिंक्स किंवा फाईल्स असतात ज्यांना क्लिक करताच तुमच्या फोनवर मालवेअर डाऊनलोड होतात, जे तुमची वैयक्तिक माहिती चोरतात.

4 / 5
 हॅकर्स मोबाईल सिम विकणाऱ्या कंपनीकडे जाऊन चोरलेल्या डाटाद्वारे बनावट कागदपत्रे सादर करतात. असे लोक फोन चोरीला गेल्याचे सांगतात. यानंतर सिम कंपनी नवीन सिम जारी करते आणि त्यावर तुमचा चोरलेला नंबर पोर्ट करुन मिळवितात. त्यानंतर, हे नवीन सिम वापरून सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी मिळवतात.

5 / 5
TRAI ने 14 मार्च 2024 रोजी टेलिकम्युनिकेशन मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी ( नववी सुधारणा ) नियमावली, 2024 अंतर्गत हे नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांमध्ये यापूर्वी आठ वेळा बदल झाले आहेत. मोबाईल नंबर पोर्टिंगला  सिम स्वॅप घोटाळेखोरांपासून रोखण्यासाठी हे सुधारित नियम जारी केले असल्याचे ट्रायने म्हटले आहे.