Train News : ट्रेनचे तिकीट हरविले किंवा फाटले? अजिबात चिंता करु नका, येथे वाचा नेमके काय करायचे ते…
ट्रेनचा प्रवास करताना तुमचे तिकीट हरविले किंवा फाटले तर काय करायचं ? तुम्हाला प्रवास करता येणार नाही का ? तेव्हा तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही.या लेखात आपण रेल्वेचे तिकीट जर आपण प्रवास करण्यापूर्वी आपल्याकडून हरविले तर काय करायचे हे पाहणार आहोत.
1 / 6
1-डुप्लिकेट तिकीट काढण्यासाठी भरावे लागते शुल्क जर तुम्ही तिकीट तपासनीसाला तिकीट हरविल्याचे सांगून तिकीट तपासनीसांकडे (टीटीई) डुप्लिकेट तिकीट देण्याची मागणी केली तर हे तिकीट मोफत मिळत नाही. तर त्यासाठी रेल्वे तुमच्याकडून पैसे आकारणार आहे. रेल्वे या डुप्लिकेट तिकीटाची नाममात्र रक्कम आकारते. या नंतर तुम्हाला रेल्वेकडून पावती दिली जाते. या मार्फत तुम्ही पुढील प्रवास निर्धास्तपणे करु शकता.
2 / 6
2-डुप्लिकेट तिकीटासाठी किती शुल्क लागते तिकीट तपासनीसांना तुम्ही तिकीट हरविल्याचे सांगितल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट तिकीटासाठी ठराविक रक्कम आकारली जाते. या साठी जादा शुल्क भरण्याची गरज नाही. जर तुम्ही स्लीपर क्लास वा सेकेंड क्लासने प्रवास करीत असाल तर केवळ 50 रुपयांत डुप्लिकेट तिकीट वितरीत केले जाते. या मुळ तिकीटांच्या बदल्यात रेल्वे प्रवासात ग्राह्य धरले जाते. या डुप्लिकेट तिकीटाद्वारे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करु शकता. अन्य श्रेणीसाठी याचे शुल्क वेगवेगळे आहे.
3 / 6
3-अन्य श्रेणीसाठी काय शुल्क रेल्वेत अन्य श्रेणी कोणती असा तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल तर भारतीय रेल्वेत वेगवेगळ्या श्रेणीचे तिकीट दर भिन्न- भिन्न आहेत.तसेच विविध श्रेणी नुसार त्यातील डुप्लिकेट तिकीटाची शुल्क रक्कम निर्धारित केली जाते. जर तुम्ही स्लीपर आणि सेंकड क्लास शिवाय अन्य श्रेणीच्या डब्यातून प्रवास करीत असताना जर तुमचे तिकीट हरविले तर तुम्हाला ऑन ड्यूटी टीसीकडून त्याचे डुप्लिकेट तिकीट काढायचे असेल तर 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
4 / 6
4-तिकीट फाटल्यावर काय कराल ? प्रवासात जर तुमचे रेल्वे तिकीट काही कारणांनी भिजले किंवा फाटले तर किंवा मुलांनी फाडले किंवा काही कारणांनी ते खराब झाले तर तुम्ही जर प्रवास करीत असाल तर आपल्या सोबत असा प्रकार घडला तर तु्म्हाला तुमच्या प्रवासाच्या भाड्याच्या 25 टक्के रक्कम डुप्लिकेट तिकीटासाठी मोजावी लागेल.
5 / 6
indian railway
6 / 6
6-हरविलेले तिकीट सापडल्यावर काय करायचे ? काही वेळा प्रवासात आपले तिकीट सापडत नाही म्हणून आपण तिकीट तपासनीसांकडून तिकीट तयार करुन घेत असतो. परंतू ओरिजिनल तिकीट कुठे तरी ठेवलेले आपल्याला सापडते तेव्हा ट्रेन सुटण्याआधी आपले डुप्लिकेट तिकीट जमा करुन तुमचे पैसे तुम्ही परत घेऊ शकता.एवढ्या भानगडी करण्यापेक्षा प्रवासात ट्रेनचे तिकीट सांभाळून ठेवावे,तर एक तरी सरकारी ओळखपत्र जवळ बाळगावे. त्यामुळे आपण निर्धास्तपणे प्रवास करायला मोकळे होतो.