दक्षिण भारतातील उटी हे हिल स्टेशन पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसते. पावसाळ्यात इथे फिरण्याची मजा वेगळीच असते. या सिझनमध्ये तुम्ही तुमची ट्रिप कशी पूर्ण करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दोड्डाबेट्टा: निलगिरी पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध, तुम्ही उटीमध्ये पहिल्या दिवशी दोड्डाबेट्टाला भेट देऊ शकता. या ठिकाणी ट्रॅकिंग करता येते. मात्र, पावसाळ्यात कोणत्याही स्पोर्टस ऍक्टीव्हिटी तेथील लोकल गाईडच्या मार्गदर्शनानुसारच करा.
भवानी तलाव: जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जात असाल तर इथे तुम्हाला गेलंच पाहिजे आणि या शांत तलावाच्या परिसरात तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. भवानी तलावाला उटी तलाव असेही म्हणतात. इथे जाताना तुम्ही एमराल्ड लेकच्या सहलीचा आनंद घेऊ शकता.
बोटॅनिकल गार्डन, ऊटी: जर तुम्हाला संपूर्ण दिवस हिरव्यागार आणि सुरक्षित ठिकाणी घालवायचा असेल तर तुम्ही यासाठी उटीचे बोटॅनिकल गार्डन निवडू शकता. या छोट्याशा सुंदर जागेत कॅक्टस, आर्केडची सुंदर रोपं तुम्हाला पाहायला मिळतील.
टी पार्क: दक्षिण भारतात अनेक सुंदर चहाच्या बागा आहेत, ज्यात उटी येथील टी पार्कचा समावेश आहे. उटी येथील चहाच्या बागेची देखभाल राज्य सरकार करते. चहाच्या बागां बघायला तुम्ही गेलंच पाहिजे.