आपल्या डोळ्यांखालची त्वचा बऱ्याच वेळेस काळसर झालेली दिसते. याला डार्क सर्कल असे म्हणतात. ही समस्या कॉमन आहे. झोप पूर्ण न होणे, एखाद्या गोष्टीचा ताण घेणे, यामुळे हा त्रास होऊ शकतो.
मात्र या डार्क सर्कलमुळे आपला लूकही बिघडतो. डोळ्यांखालच्या काळसर च्वचेमुळेह चेहराही चांगला दिसत नाही. डार्क सर्कलपासून मुक्ती मिळवणे फार सोपे नाही. मात्र महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा काही घरगुती उपायांनी ही समस्या दूर करता येऊ शकते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांनाही आराम मिळतो. काही स्किन केअर टिप्स जाणून घेऊया.
कोल्ड टी बॅग्ज : 1-2 टी बॅग्ज घेऊन त्या पाण्यात भिजवून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. काही वेळानंतर या टी बॅग्ज फ्रीजमधून काढून डोळ्यांवर ठेवाव्यात. यामध्ये असलेल्या कॅफेनमुळे स्किन प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात. नियमितपणे हा उपाय केल्यास अपेक्षित फरक दिसून येईल.
कोरफड जेल : त्वचेसाठी सौंदर्यप्रसाधन वापरताना कोरफड ही सर्वोत्तम आणि ऑलराऊंडर मानली जाते. डोळ्यांखालची काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली व चेहऱ्यावर कोरफडीचे जेल वापरावे. यामुळे नैसर्गिक पद्धतीने डार्क सर्कल कमी होतील.
टोमॅटो आणि लिंबाचा रस : टोमॅटो व लिंबू हे केवळ आपल्या आहारासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. या दोन्हींमध्ये अशी तत्वं असतात, ज्यामुळे त्वचा अधिक चांगल्या व नैसर्गिक पद्धतीने सुधारू शकते. डार्क सर्कल दूर करण्यासाठी एका वाटीत लिंबाचा रस घेऊन त्यात थोडा टोमॅटोचा रस घालावा. ते नीट एकत्र करून डोळ्यांखाली जिथे काळसर भाग असेल तिथे लावावे व वालल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. एक महिना हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.