Marathi News Photo gallery Try these tips and trick to increase internet speed of your smartphone you will get rocket like speed
Mobile चं नेटं झालंय स्लो ? या टिप्सनी मिळेल रॉकेट स्पीड इंटरनेट; करून तर पहा..
काहीवेळा फोनमुळे वेगवान इंटरनेट वापरण्यातही समस्या निर्माण होतात. त्यामुळे व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया ब्राउझ करणे किंवा फिरताना काम करताना खूप अडचणी येऊ शकतात. इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी काय करता येईल ?
1 / 8
आजकाल मोबाईल हा लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वांच्यात हातात दिसतो. वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे लोकं आता स्मार्टफोनवर 5G नेटवर्कचा आनंद घेत असले तरी, देशातील अनेक भाग असे आहेत जिथे इंटरनेट अतिशय स्लो, संथ असतं. तसंच काहीवेळा फोनमुळे फास्ट इंटरनेट वापरण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत, व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडियावर ब्राऊजनिंग करणं आणि प्रवासात इंटरनेटवर सर्फिंग करण्यात प्रचंड अडचणी येतात. (Photo credit-getty Image)
2 / 8
स्मार्टफोनवर इंटरनेट स्लो होण्याची अनेक कारणे असू शकतात. जुनं सॉफ्टवेअर पासून ते वेग कमी करणाऱ्या बॅकग्राउंड ॲप्सपर्यंत. पण असं असलं तरी आपण आप्लाय स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड सुधारू शकतो. त्यासाठी अनेक क्लृप्त्या आहेत. आज आपण अशाच काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड वाढवू शकता. (Photo credit-getty Image)
3 / 8
फोन रीस्टार्ट करा: जसा आपण फोन वापरत जातो, तसतसा फोनमध्ये सॉफ्टवेअर बग विकसित होऊ शकतो. फोनचे सॉफ्टवेअर सतत काम करत असले तरी ते खराब होऊ शकते. सॉफ्टवेअर रीफ्रेश करण्यासाठी तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करू शकता, जेणेकरून तो पुन्हा नीट काम करेल. (Photo credit-getty Image)
4 / 8
बॅकग्राउंड ॲप्स बंद करा: अनेक वेळा फोनच्या बॅकग्राउंडमध्ये अनेक ॲप्स चालू असतात, ज्यामुळे फोनमधील डेटाचा जास्त वापर होतो. यामुळेही फोनच्या नेटचा स्पीड कमी होऊ शकतो. डेटा वाचवण्यासाठी आणि तुमचा इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी वापरत नसलेली ॲप्स बंद करावीत (Photo credit-getty Image)
5 / 8
ॲड ब्लॉकरचा वापर : स्मार्टफोनमध्ये अनेक फोटो आणि लिंक्स यासारखी अनेक प्रकारचे ॲड पॉप-अप दिसत राहतात, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन डेटा खर्च होतो आणि इंटरनेटचा वेग कमी होतो. या जाहिराती ब्लॉक करण्यासाठी तुम्ही ॲड ब्लॉकर ॲप्स वापरू शकता. तुम्हाला Google Play Store वर अनेक प्रकारचे ॲड ब्लॉकर ॲप्स सापडतील, ज्यामधून तुम्ही सर्वोत्तम पर्याय निवडू शकता (Photo credit-getty Image)
6 / 8
सॉफ्टवेअर अपडेट तपासत रहा : जरी तुमच्या आजूबाजूचे नेटवर्क मजबूत असले तरी, जुन्या सॉफ्टवेअरमुळे इंटरनेट स्पीडवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, नेहमी सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन अपडेट्सवर लक्ष ठेवावे आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठी ते लगेच इन्स्टॉल करावे (Photo credit-getty Image)
7 / 8
वेगळ्या नेटवर्कशी कनेक्ट करा : तुमचे सध्याचे नेटवर्क स्लो असेल तर सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट किंवा सेल्युलर नेटवर्क सारख्या वेगळ्या नेटवर्कशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनची किंवा तुमच्या नेटवर्कची समस्या ओळखण्यात मदत होऊ शकते (Photo credit-getty Image)
8 / 8
तुमच्या फोनमधील कॅशे आणि कुकीज साफ करा : वापर वाढल्यावर आपला फोन हा ॲप्समधून डेटा गोळा करत राहतो, ज्यामुळे तुमच्या नेटवर्कवर देखील परिणाम होतो आणि इंटरनेटचा वेग कमी होतो. फोनमधील कॅशे आणि कुकीज साफ केल्याने फोनचे नेटे सुधारू शकते. हे करण्यासाठी, Settings > Apps & notifications > See all apps वर जा. त्यानंतर, ॲप वर टॅप करा आणि स्टोरेज आणि कॅशे > कॅशे साफ करा आणि स्टोरेज साफ करा या पर्यायावर जा. (Photo credit-getty Image)