PHOTO | तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कालभैरव देवाचा अग्नीचा भेंडोळी उत्सव, पाहा खास फोटो
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कालभैरव देवाचा अग्नीचा भेंडोळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कालभैरवसह इतर सात भैरव हे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे भाऊ आहेत. तुळजापुरात काळभैरवासह टोळभैरव आणि इतर भैरवांची मंदिरे आहेत.
-
-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कालभैरव देवाचा अग्नीचा भेंडोळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
-
-
कालभैरवसह इतर सात भैरव हे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे भाऊ आहेत. तुळजापुरात काळभैरवासह टोळभैरव आणि इतर भैरवांची मंदिरे आहेत.
-
-
काशीनंतर फक्त तुळजाभवानी येथे सर्व भैरवांची मंदिरे आहेत. सर्व 9 ग्रहांच्या अनुकुलतेसाठी आणि वर्षभरात कळत नकळत केलेल्या चुका आणि पापातून मुक्ती मिळावी यासाठी काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक भेंडोळी उत्सवात साजरा केला जातो.
-
-
या उत्साहात अनेक भाविक सहभागी झाले होते. तुळजाभवानी आणि कालभैरव यांची या उत्सवात वर्षातून एकदा भेट होते ही भक्तांची धारणा आहे.
-
-
एका लांब लाकडी दांडक्याला केळी, चिंच, आंबा आणि इतर वृक्षांची पाने गुंडाळी जातात. या लाकडाच्या मधोमध तेलात बुडवलेले कापड लावले जाते. त्याला पेटवून लाकडाच्या दोन्ही बाजू खांद्यावर घेवून भेंडोळीची मिरवणूक कालभैरव मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत काढण्यात येते.
-
-
तुळजापुरातील तरुण पुजारी हे लाकूड दोन्ही बाजूला धरत अशा प्रकारे तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी चरणी घेवून जात आशीर्वाद घेतात .