PHOTOS: एकाच मंडपात, एका नवरदेवासोबत 2 बहिणींनी लग्न केलं, करतील तरी काय, काही संकटांवर औषधंच जालिम असतं

| Updated on: May 16, 2023 | 2:21 PM

OMG Wedding : सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. शहनाईचे सूर देशाच्या विविध भागांत ऐकायला येत आहेत. असंच एक आगळंवेगळं लग्न सध्या चर्चेत आहे. एकाच लग्नमंडपात एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींसोबत सात फेरे घेतेल. विशेष म्हणजे हे सर्व कुटुंबीय आणि समाजातील लोकांच्या संमतीने घडले. त्यामागचे कारण खूप भावनिक आहे.

1 / 6
सध्या देशातील एका लग्नाची खूप चर्चा आहे. नवऱ्या मुलाने दोन सख्या बहीणीशी एकाच मांडवात विवाह केला आहे. या विवाहास कोणाचाच विरोध नसून सर्वांनी नवरदेवाचे कौतूक करीत आशीर्वाद दिले आहेत. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्यासह समाजातील सर्व लोक उपस्थित होते. पण प्रश्न असा आहे की या तरुणाने एकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न का केले?

2 / 6
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील उनियारा उपविभागातील मोरझाला येथे राहणाऱ्या हरिओम मीना याचे निवाई उपविभागातील सिद्दा गावात बाबू लाल मीना यांची मोठी मुलगी कांता हिच्याशी लग्न होणार होते. मात्र लग्नाआधी कांताने अशी अट घातली, ज्यामुळे हरिओम मीना आणि त्यांचे कुटुंबीय चक्रावले.

3 / 6
एंगेजमेंटपूर्वी कांताने धक्कादायक अट घातली. वास्तविक, कांताची धाकटी बहीण सुमन ही स्पेशल चाइल्ड आहे. कांताने लग्नानंतर धाकट्या बहिणीला सोबत ठेवण्याची अट घातली. जर हरिओम ही अट मान्य करेल तरच हे लग्न होईल, अशी अट कांताने त्याच्यासमोर ठेवली.

4 / 6
 कांता आणि सुमन यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मोठी बहीण असल्याने कांता सुमनची काळजी घेते. लग्नानंतर तिचं काय होईल, असा विचार करून कांताने हरिओमसमोर हा प्रस्ताव ठेवला. हरिओम त्या दोघांशी लग्न करून त्यांना सुखी ठेवण्याचे वचन दिले. यासाठी दोन्ही कुटुंबीयांनीही संमती दिली.

5 / 6
दोन्ही बहिणींचे लग्न निश्चित झाल्यावर लग्नपत्रिकेवर दोन्ही बहिणींची नावेही लिहिली गेली. 5 मे 2023 रोजी लग्न झाले होते. या अनोख्या विवाह सोहळ्यात सर्व काही घडले जसे एखाद्या सामान्य कुटुंबातील लग्नात होते. सर्व विधी पार पडले. फक्त वधू एक ऐवजी दोन होत्या. लग्नपत्रिकेत छापलेली दोन्ही बहिणींची नावे आणि कांताची स्थिती यानुसार हरिओमने अग्नीला साक्षीदार म्हणून घेतले आणि दोन्ही बहिणींना सोबत घेऊन लग्नमंडपात गेला. लग्नानंतर हरिओमच्या घरी दोन वधूंचा गृहप्रवेश झाला.

6 / 6
कांताने उर्दूमधून बीएड केले आहे. तर तिची धाकटी बहीण सुमन हिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हरिओम सुशिक्षित असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. आता कांता आणि हरिओम दोघेही एकत्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.