उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यानंतर प्रथमच शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेत कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद साधला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरेचा प्रश्न आणि आरे विषयी झालेल्या निर्णयाविषयी आपली भूमिका मांडली
आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नव्याने स्थापना झालेल्या सरकारला शुभेच्छाही दिल्या व या सरकारकडून महाराष्ट्राचे भले व्हावे, ही इच्छा व्यक्त केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून भेटीस मर्यादा होत्या आता मात्र शिवसेना प्रमुख म्हणून पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध असेल असे कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते,
ज्यांनी हे सरकार स्थापन केले, त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो, जर हे पूर्वीच केलं असतं तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले
आता सरकार वरती - खालती तुमचंच आहे. कांजुरचा प्रस्ताव दिला होता, ही जमीन मुंबईकरांची. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. पुढे या असे आवाहन त्यांनी केले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला सोडताना शिवसैनिकांनी, मुंबईकरानी आणि सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे यांच्याविषयी दाखवलेले प्रेम त्याविषयी त्यांनी आभार मानले