Uddhav Thackeray : कोकण दौऱ्यातील उद्धव ठाकरेंचे फोटो व्हायरल
महेश घोलप |
Updated on: May 06, 2023 | 2:43 PM
१-२ गावांमध्ये मी गेलो आहे. कातळशिल्प मी पहिले आहेत. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. नानार येथील प्रकल्प आम्ही घालवून टाकला होता. आजच्या गद्दारांनी मला सांगितले होते कि बारसूमध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही.
1 / 5
कोकणातला भूमीपुत्र आपल्या हक्काची जमीन वाचवण्यासाठी आक्रोश करतोय. पण सत्तापिपासू सरकारपर्यंत हा आक्रोश कधीच पोहचणार नाही अशी टीका ठाकरेंनी सरकारवरती केली आहे.
2 / 5
उद्धवसाहेब ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्त सोलगाव ग्रामस्थांशी संवाद साधला. या लढ्यात आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.
3 / 5
१-२ गावांमध्ये मी गेलो आहे. कातळशिल्प मी पहिले आहेत. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. नानार येथील प्रकल्प आम्ही घालवून टाकला होता. आजच्या गद्दारांनी मला सांगितले होते कि बारसूमध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही. बारसू प्रकल्प केल्यास कोकणचा फायदा होईल असे सांगतिले होते. जसा मी बारसूमध्ये आलो तसे त्या गद्दारांनी लोकांसमोर येऊन प्रझेंटेशन द्यावे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
4 / 5
मी कोणत्याही दबावाखाली आलो नाही, माझ्या पत्राचे भांडवल केले जाते. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी दिली जात आहे. महत्वाचे प्रकल्प गुजरातला नेले आहेत. लोकसंवाद न करता तुम्ही लोकांवर प्रकल्प कसे लादू शकता असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.
5 / 5
इथल्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांच्या काय?, इथल्या वैभवशाली निसर्गाचे का नुकसान करत आहेत. इथल्या भूमिपुत्रांच्या मत कुठे आहेत. आता ज्यांची नोंद गद्दारीची ३३ देशांनी घेतली होती. मी अंबादास दानवे, खैरे यांच्या समवेत आम्ही संभाजी नगर भागाचा दौरा केला. लोकांची भावना समजवून घेतली.