Jr NTR: केंद्रीय मंत्री अमित शाह आणि ज्युनियर एनटीआर भेटीने राजकीय चर्चांना उधाण
अमित शाह एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी हैदराबादला पोहोचले होते. ज्युनियर एनटीआरही ते ज्या हॉटेलमध्ये थांबला होते. त्यावेळी दोघांनी मिळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी या बैठकीचे फोटोसमोर आल्यावर भाजपला ज्युनियर एनटीआरला आपल्या पक्षात सामील करून घ्यायचे असल्याची अंदाज बांधले जाऊ लागलेत .
1 / 5
तेलंगणामध्ये पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांची भेट झाली. आता निवडणुकीपूर्वी या भेटीबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.
2 / 5
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ज्युनियर एनटीआरच्या भेटीची काही छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहेत. यामध्ये लिहिले आहे कि एक अतिशय प्रतिभावान अभिनेते आणि आमच्या तेलुगू सिनेमाचे ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत हैदराबादमध्ये छान भेट झाली.
3 / 5
अमित शाह यांचे हे ट्विट जूनियर एनटीआरने रिट्विट केले आणि लिहिले - अमित शाह जी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. या कौतुकास्पद शब्दांबद्दल धन्यवाद.
4 / 5
अमित शाह एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी हैदराबादला पोहोचले होते. ज्युनियर एनटीआरही ते ज्या हॉटेलमध्ये थांबला होते. त्यावेळी दोघांनी मिळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी या बैठकीचे चित्र समोर आल्यावर भाजपला ज्युनियर एनटीआरला आपल्या पक्षात सामील करून घ्यायचे असल्याची अटकळ बांधली जाऊ लागली.
5 / 5
अमित शहा आणि ज्युनियर एनटीआर यांच्या फोटोंवर टिप्पणी करताना काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले की, तेलंगणात पुढील वर्षी निवडणुका होणार असल्याने हा खेळ सुरू झाला आहे.