Marathi News Photo gallery Union minister nitin gadkari offers condolences to mla vijay rahangdale avishkar rahangdale dies in accident
Photo | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन; आविष्कार रहांगडाले यांचा अपघाती झाला होता मृत्यू
वर्धा येथे कार दुर्घटनेत सात भावी डॉक्टरांचा सत्तावीस जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यामध्ये तिरोडा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचे एकमेव पुत्र आविष्कार यांचा समावेश होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिरोडा येथे भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या घरी खमारी येथे सांत्वन देण्यासाठी आज पोहचले. त्यावेळी वातावरण अतिशय भावूक झाले होते.
वर्धा येथील कार अपघातात ठार झालेल्या आविष्कार विजय रहांगडाले यांची प्रतिमा.
Follow us on
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार रहांगडाले यांच्या कुटुंबीयांचेही सांत्वन केले.
नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरी याही यावेळी उपस्थित होत्या.
आमदार विजय रहांगडाले यांचे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आविष्कार रहांगडाले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमदार विजय रहांगडाले यांच्या घरी भेट देण्यासाठी रविवारी दुपारी पोहचले.