नंदुरबारमधील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेत. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं पुन्हा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सोमवारी गारपीट झाल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालं होतं.
हवामान खात्यानं आधीच पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार नंदुबारच्या शहादा तालुक्यात गारपिटी झाली आहे.
शहादा तालुक्यातील बामखेडा परिसरात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
गारपिटीमुळे बामखेड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मोठ्या प्रमाणात नंदुरबारच्या शहादा तालुक्यात गारपीट झाली असल्यानं वातावरणही ढगाळ झालं होतं.