अमरावती जिल्हात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने 9 तालुक्यात काढणीला आलेल्या गहू,हरभरा व कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांसमोर पीक वाचवण्याचं आव्हान आहे.
गहू व हरभरा, कांदा काढण्याची तयारी शेतकरी करत होते.मात्र हातात आलेलं पीक निसर्गाने हिरावून नेलं आहे..यात सर्वाधिक गहू पिकांचं नुकसान झाले आहे. काढणीवर असलेला गहू जमीनदोस्त झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शनिवारी दुपारी आलेला दहा ते पंधरा मिनिटे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर होते शेती पिकाचे नुकसान झालं आहे.
पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.अवकाळी पावसानं बुलडाण्यातही पपई शेतीचे मोठे नुकसान झालं आहे.
अहमदनगर जिल्हयाला गारपीटीचा तडाखा बसला आहेय पाथर्डी , शेवगाव , नेवासा , राहूरी , कोपरगाव , संगमनेर तालुक्यात मोठ नुकसान झालं आहे. रब्बी हंगामातील गहू , हरबरा , कांदा पिकांसह फळबागांच मोठ नुकसान झालंय. जळगावच्या चाळीसगावमध्येही गारपीट झाली.
परभणी जिल्ह्यात हवामान खात्याचा अंदाजा खरा ठरला असून अवकाळी पावसानं शेतीच नुकसान झालं आहे. गहू आणि कांदा पिकांचे नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या गहू आणि कापणीला आलेले हरभरा या पिकांना गारपीट व अवघड सर्वाधिक फटका बसला आहे.