Upcoming Cars : टोयोटाच्या 5 नव्या गाड्यांची मार्केटमध्ये हवा, नावं आणि फीचर्स जाणून घ्या
गेल्या काही दिवसांपासून टोयोटाच्या नव्या गाड्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. भारतात टोयोटाच्या पाच गाड्या लाँच केल्या जाण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात याबाबत
1 / 5
Toyota Rumion : टोयोटा रुमियन गाडी दक्षिण आफ्रिकेत विक्री केली जाते. भारतीय बाजारात आणखी काही अपडेट्ससह लाँच केली जाण्याची शक्यता आहे. अपकमिंग कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉस प्रमाणे बाजारात दाखल केली जाऊ शकते. यात 1.5 लिटर माइल्ड हायब्रिड इंजिन असण्याची शक्यता आहे. (प्रातिनिधिक फोटो Toyota)
2 / 5
Toyota SUV Coupe : टोयोटाची नवी एसयुव्ही या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. या गाडीची मारुती फ्रॉन्क्सशी स्पर्धा असेल. अपकमिंग गाडी 5 सीटर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रातिनिधिक फोटो Toyota)
3 / 5
Toyota 7-Seater SUV : भारतीय बाजार नवी 7 सीटर एसयुव्हीही सादर केली जाऊ शकते. ग्लोबल मार्केटमध्ये विकली जाणीर कोरोला क्रॉस एसयुव्हीचं थ्री रो वर्जन असू शकते. अपकमिंग एसयुव्हीच्या व्हीलबेस मोठा असेल. तसेच यातील बुट स्पेसही मोठा असण्याची शक्यता आहे. (प्रातिनिधिक फोटो Toyota)
4 / 5
Next-Gen Toyota Fortuner : भारतीय बाजारात टोयोटा फॉर्च्युनरला मोठी मागणी आहे. एका बातमीनुसार कंपनी लवकरच नेक्स्ट जनरेशन मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. देशात फुल साईज 7 सीटर एसयुव्हीची मोठी मागणी आहे. यामुळे गाडीची मागणी जोर धरेल अशी अपेक्षा आहे. (प्रातिनिधिक फोटो Toyota)
5 / 5
Toyota Electric SUV : भारतात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. कंपनी इलेक्ट्रिक एसयुव्ही सादर करू शकते. ही गाडी टाटा बीझेड4एक्स वर आधआरित असेल. रिपोर्टनुसार अपकमिंग एसयुव्ही एकदा चार्ज केल्यावर 500 किमी रेंज देऊ शकते. (प्रातिनिधिक फोटो Toyota)