Photos : UPSC टॉपरचं नातं तुटलं, IAS कपल टीना दाबी आणि अतहर खान घटस्फोट घेणार
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या IAS अधिकारी टीना दाबी आणि त्यांचे IAS पती अतहर खान नातं टिकवण्यात अपयशी ठरले आहेत.
-
-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या IAS अधिकारी टीना दाबी आणि त्यांचे IAS पती अतहर खान नातं टिकवण्यात अपयशी ठरले आहेत.
-
-
दोघांनीही खासगी आयुष्यातील मतभेदांनंतर जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ते परस्पर संमतीने घटस्फोट घेणार आहेत.
-
-
टीना दाबी 2015 मध्ये UPSC च्या टॉपर राहिल्या आहेत. त्याच वर्षी अतहर खान दुसऱ्या क्रमांकावर होते. ते दोघे IAS च्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
-
त्यांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं. अतहर मूळचे काश्मीरचे आहेत.
-
-
टीनाने काही वेळेपूर्वीच आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंट्सच्या नावातून पतीचं आडनाव असलेलं खान नाव हटवलं आहे. यानंतर अतहर खान यांनी देखील टीनाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं.
-
-
2018 मध्ये दोघांनीही लग्न केलं तेव्हा तो चर्चेचा विषय ठरला होता. अनेक राजकीय नेत्यांनी या टॉपर IAS कपलला सुखी आयुष्याच्या सदिच्छा दिल्या होत्या.
-
-
दुसरीकडे हिंदू महासभेने हा प्रकार लव जिहादचा असल्याचा आरोप करत लग्नाला विरोध केला होता.
-
-
टीना दाबी मूळची जयपूरचीच आहे. असं असलं तरी त्यांचा जन्म भोपाळमध्ये झाला होता. कान्वेंट ऑफ जीसस अँड मेरी स्कूलमधून त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.
-
-
त्या 7 वीच्या वर्गात असताना त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीत शिफ्ट झालं होतं. टीना दाबी यांचे वडील जसवंत दाबी आणि आई हिमानी दोघेही इंजिनीअर आहेत.
-
-
UPSC मध्ये निवड झाल्यानंतर टीना आणि अतहर मसूरी येथील ट्रेनिंगच्या काळात एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे टीना यांनी लग्नाआधीच अतहर यांच्यासोबत नात्यात असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं होतं.