अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या चित्र-विचित्र फॅशन व स्टाईल स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत असते. कधी सेफ्टीपिन पासून ड्रेस, तर कधी साडी,हाय हिल्स घालून दोरीवरच्या उड्या मारताना दिसत असते. यानंतर उर्फी तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे.
यामध्ये उर्फीने स्लिव्ह्जपासून टॉप बनवला आहे. आपल्या जुन्या शर्टाच्या बाह्यांपासून तिने हा टॉप बनवला आहे. हा टॉप घालून तिने आपले फोटिया सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
'पॅन्ट शर्ट इन माय स्टाईल' असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. सिंथ्याटिकच्या हिरव्या रंगातील शर्टाच्या बाहयांपासून तिने हा टॉप बनवला आहेया.
फ्रंट ओपन क्रॉप टॉपबरोबर उर्फीने अजब आकारातील ट्राऊजर घातली आहे, त्या ट्राऊजरवर वरून एक पँट चिटकवलेली दिसून आली आहे. यासोबतच उर्फीने न्यूड ब्राऊन मस्कारा लावत ग्लमरस लूक तयार केला आहे. जिक-जॅकपार्ट हेअर लूक बनवला आहे.
उर्फी जावेदचा अजब-गजब प्रकारातील फॅशन लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही यावर भरभरून कमेंट केल्या आहेत .