प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.
भरधाव कारने मेट्रोचं काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे
उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला.
चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.
या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला.
झालेल्या अपघातात उर्मिलाच्या कारचा पुढचा भागाचा चक्काचूर झाला आहे
याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनास्थळावरील कारचे फोटो व्हायरल