'डेडपूल' अभिनेता रायन रेनॉल्ड्सचा जन्म कॅनडामध्ये झाला होता, परंतु तो बराच काळ अमेरिकेत आहे आणि त्याने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. अलीकडे, रायनने पत्नी ब्लेकसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या पहिल्या मतदानाचा अनुभव सांगितला आहे.
हॉलिवूड अभिनेते स्नूपडॉग यांनी जूनमध्ये आपण पहिल्यांदाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहोत, अशी घोषणा केली होती. अमेरिकेत त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते.
2020च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यापैकी एकाची निवड करण्यासाठी अभिनेत्री सेलेना गोमेझदेखील मतदान करणार आहे. गेल्या आठवड्यात सेलेनाने तिच्या मतदानाच्या अनुभवाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
जे हॉलिवूडकर पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांच्या यादीत केल्सी बॅलेरिनीचा समावेश आहे. केल्सी बॅलेरिनी हॉलिवूडची एक प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे.
यंदाच्या राष्ट्रपती निवडणुकीत आपण डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्याविरूद्ध लढणार असल्याचे जाहीर करत, 43 वर्षीय अभिनेता कान्ये वेस्टने सर्वांना चकित केले होते. फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत कान्येने आपण पहिल्यांदाच मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.
'द अॅव्हेंजर्स' फेम अभिनेत्री कोबी स्मुल्डर्स ही सुद्धा पहिल्यांदाच मतदान करणार आहे. कोबीचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये तिने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.