Photo: बाबांनो मास्क वापरा, नाही तर लॉकडाऊन अटळ; भुजबळांनी भर बाजारात हात जोडले!
VN |
Updated on: Mar 27, 2021 | 3:57 PM
नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मनपा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. असं असलं तरीही नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. (use a mask, otherwise lockdown is inevitable; Bhujbal joins hands in Market)
1 / 10
नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मनपा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. असं असलं तरीही नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.
2 / 10
अशावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री छगन भुजबळ रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
3 / 10
भुजबळ यांनी नाशिकच्या रस्त्यांवर उतरुन रिक्षाचालक, छोटे दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मास्क लावण्याचं आणि नियम पाळण्याच्या सूचना करत होते.
4 / 10
प्रशासनाकडून नियम लावले जात आहेत. पण नागरिक ऐकत नाहीत. त्यामुळे नाशिकमधील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोनास्थिती पाहता नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. लोक सांगूनही ऐकत नसतील तर शेवटी लॉकडाऊन या शेवटच्या पर्यायाचा विचार करावा लागेल, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.
5 / 10
नाशिकची वाटचाल टाळेबंदीच्या दिशेने सुरु आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. डॉक्टरचं कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याने येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती आहे.
6 / 10
बेड उपलब्ध करुन देणे अवघड नाही, मात्र आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात सापडले तर उपचार कोण करणार त्यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळावे, असं आयुक्तांनी दरडावलं आहे.
7 / 10
नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर शेवटचा पर्याय म्हणून टाळेबंदी करावी लागेल, असं भुजबळ यांनी सांगितलं. काल दिवसभरात 3 हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाल्याने आज तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर सतीश कुलकर्णी,आयुक्त कैलास जाधव यांच्यासह इतर नेते बैठकीला उपस्थित होते.
8 / 10
भुजबळांनी यावेळी प्रत्येक दुकानदाराला नियम पाळा असं बजावून सांगितलं आहे.
9 / 10
एवढंच नाही तर त्यांनी रुग्णालयांना सुद्धा भेटी दिल्या आहेत.
10 / 10
यावेळी कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते.