शेतीच्या दृष्टीने पेरणीचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
परंतु नेमकी याचवेळी मजुरांची टंचाई निर्माण होते किंवा जादा पैसे देत पेरणी करून घ्यावी लागते.
यावर पर्याय म्हणून नवनवीन पेरणी यंत्रे आल्याने शेतकरी त्यांचा अवलंब करू लागल्याने मजुरीत मोठी बचत होऊ लागली आहे.
मका पेरणीसाठी नाशिक जिल्ह्यातील देवळ्यामध्ये अशाच नवनवीन यंत्रणाचा वापर वाढला आहे.
मालेगाव तालुक्यात गिरणा नदीकाठावरील अनेक शेतकरी मका पेरणीसाठी मका टोकन यंत्राचा वापर करू लागले आहेत.