Marathi News Photo gallery Valentine's Day Special: Do you know the shows that so many celebrities have proposed in the national show?
Valentine’s Day Special: इतक्या सेलिब्रिटींनी नॅशनल शो मध्ये केलंय प्रपोज, प्रपोज केलेले शो तुम्हाला माहित आहेत का ?
महेश घोलप |
Updated on: Feb 14, 2022 | 4:14 PM
आता जेव्हा आपण प्रेमाच्या गोष्टी करतोय तर आपण सेलिब्रिटीच्या बाबतीत सुध्दा चर्चा करायला हवी कारण या सेलिब्रिटींनी सगळ्यांच्या समोर आपलं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे.
1 / 5
आज कोणी प्रेमाची शपथ घेतोय, तर कोणी प्रेमाला आपल्या जोडीदारासोबत मजा घेतोय. आता जेव्हा आपण प्रेमाच्या गोष्टी करतोय तर आपण सेलिब्रिटीच्या बाबतीत सुध्दा चर्चा करायला हवी कारण या सेलिब्रिटींनी सगळ्यांच्या समोर आपलं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे.
2 / 5
बिग बॉस 14 ज्यांच्यामुळे गाजलं असा सिंगर राहूल वैद्य प्रपोज देशातील अनेक प्रेक्षकांनी पाहिला असेल. त्याने शो मधून एका मुलीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ती त्या शो मध्ये आली हा म्हणाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केलं आहे.
3 / 5
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आपल्या चांगल्या अभिनयामुळे कायम चर्चेत असते. तिला विक्रांत सिंह राजपूत याने नॅशनल टिव्ही शोमध्ये प्रपोज केलं होतं. मोनालिसाने हा म्हणाल्यानंतर त्यांचं लग्न देखील शोमध्ये झालं होतं.
4 / 5
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे एका मालिकेतून घराघरात पोहोचले. त्यानंतर दोघांनी एका डान्स शोमध्ये भाग घेतला होता. तिथं सुध्दा त्यांनी चांगला डान्स केला होता, सुशांतने स्टेज शोमध्ये अंकिता प्रपोज केल्याचं सगळ्यांनी पाहिलं होतं. पण दोघांचं नात अधिककाळ टिकलं नाही.
5 / 5
गुरमीत चौधरी आणि देबीना बनर्जी यांची स्टोरी एखाद्या चित्रपटातील स्टोरी असल्यासारखी प्रेमाची स्टोरी आहे. ते दोघे एका मालिकेत काम करत असताना गुरमीतने प्रपोज केलं होतं. ते पण त्याने गुडघ्यावर बसून हातात अंगठी घालून प्रपोज केलं होतं. त्यावेळी घाबरलेल्या देबीनाने काहीचं उत्तर दिलं नव्हतं. त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पुर्ण झाले आहेत.