‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला बांधली लगीनगाठ, कोणकोणत्या सेलिब्रिटींचा प्रेमदिनी घेतली साताजन्माची वचनं?
महेश घोलप |
Updated on: Feb 14, 2022 | 10:57 AM
नेक सेलिब्रिटींना आपली लग्नाची गाठ चक्क ‘व्हॅलेन्टाईन्स डे'ला बांधली आहे. जाणून घेऊया कोण आहेत ते सेलिब्रिटी ? संजय दत्त, राम कपूर, मंदीरा बेदी अशा अनेक कलाकारांनी लग्न केलं आहे.
1 / 6
अनेकांना आपलं लग्न ‘व्हॅलेन्टाईन्स डे' व्हावं असं वाटतं असतं, कारण आज संपुर्ण जगात प्रेमाचा दिवस साजरा करताना कपल दिसत असतात. त्यात सेलिब्रिटी देखील कुठे मागे आहेत. अनेक सेलिब्रिटींना आपली लग्नाची गाठ चक्क ‘व्हॅलेन्टाईन्स डे'ला बांधली आहे. जाणून घेऊया कोण आहेत ते सेलिब्रिटी ? संजय दत्त, राम कपूर, मंदीरा बेदी अशा अनेक कलाकारांनी लग्न केलं आहे.
2 / 6
अरशद वारसी - मारिया गोरेट्टी अरशद वारसी आणि मारीया गोरेट्टी यांची भेट एका डान्सच्या कार्यक्रमात 1991 ला झाली. त्यानंतर दोघांची बॉलीवूडमध्ये अनेकदा चर्चा सुध्दा झाली आहे, त्यानंतर दोघांचं प्रेमाचं नात एकदम घट्ट झाल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये 14 फेब्रुवारीला लग्न देखील केल आहे.
3 / 6
रूसलान मुमताज - निराली मेहता अभिनेत्री रूसलान मुमताज हीला तिचं प्रेम शामक डावर अॅकेडमीमधून मिळालं आहे. निराली मेहत्याने तिला पत्नी म्हणून मान्य केलं आहे. 14 फेब्रुवारीला 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं आहे. त्याचं लग्न गुजराती पध्दतीने झालं आहे.
4 / 6
संजय दत्त - रिया पल्लई संजय दत्तने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर चोरून दुसरं लग्न रिया पल्लई हीच्या सोबत 14 फेब्रुवारीला केलं असल्याचं समजतंय. त्यावेळी दोघांचंही प्रेम नवीन होतं. त्याचं नात अधिककाळ राहू शकल नाही. त्यांनी लगेच विभक्त व्हायचा निर्णय घेतला.
5 / 6
राम कपूर - गौतमी गाडगीळ राम कपूर आणि गौतमी गाडगीळ हे एका शुटिंगदरम्यान भेटले होते. काम करत असताना दोघांचे विचार जुळल्याने त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. 14 फेब्रुवारी 2003 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्याचं आजही नातं चांगलं असल्याची चर्चा आहे.
6 / 6
मंदीरा बेदी - राज कौशल मंदीरा बेदीने राज कौशलसोबत 14 फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न केलं. त्यावेळी दोघांचही नातं एकदम घट्ट होतं. त्यांची एका ऑडिशन दरम्यान भेट झाली होती. तिथून पुढे त्याच्या प्रेमाची सुरूवात झाली. 22 वर्षात त्याच्या नात्यामध्ये कधीही कटूता आली नाही. पण मागच्यावर्षी राज कौशल यांचं निधन झालं.