लॉकडाऊनमध्ये मोकळीक मिळताच बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच मालदीवकडे धाव घेतली आहे.
तापसी पन्नू, मौनी रॉय, मंदिरा बेदी यांच्यानंतर अभिनेता वरुण धवनदेखील मालदीवला पोहोचला आहे.
वरुणने सोशल मीडियावर त्याचे ‘व्हॅकेशन मूड’मधले फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूडच्या आवडत्या वरुणनंसुद्धा मालदीवमध्ये धमाल केली आहे. इनस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यानं या ट्रीपची झलक दिली होती.
त्याने आणखी एक क्युट फोटो शेअर केला आहे. यात तो एका सशाला गाजर खाऊ घालतो आहे.
वरुणचे हे फोटो आवडले असले तरी यात कुठेही त्याची गर्लफ्रेंड दिसत नसल्याने, ‘नताशा कुठेय?’ असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारला आहे.
लवकरच वरुण धवन आणि सारा अली खानचा ‘कूली नंबर 1’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.