काटेरी झाडं तुळशीचे रोप कोमल असते. या रोपाला स्वतःचे काटे नसतात, म्हणूनच तुळशीच्या रोपाजवळ दुसरे काटेरी रोप ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाभोवती काटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात अडचणी येण्याची भीती असते.
चप्पल कोणत्याही प्रकारची चप्पल आणि शूज, मग ते स्वच्छ, नवीन किंवा घाणेरडे असो, तुळशीजवळ ठेवू नये. तुळशीजवळ शूज आणि चप्पल ठेवणे म्हणजे तुळशीमातेचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे घरात दारिद्र्य येते आणि सुख-समृद्धी नष्ट होते.
झाडणी माता लक्ष्मीच्या संदर्भात असे म्हटले जाते की, संध्याकाळी घर झाडल्याने लक्ष्मी नाराज होते किंवा झाडणीचा अनादर केल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो. पण, तुळशीच्या रोपासमोर झाडणी ठेवणे देखील चांगले मानले जात नाही. असे म्हटले जाते की असे केल्याने घरामध्ये आर्थिक समस्या आणि त्रास सहन करावा लागतो.
कचरा कुंडी- तुळशीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. तुळशीच्या रोपाजवळ कचरा किंवा डस्टबिन ठेवल्यास त्या व्यक्तीला तुळशीमातेच्या कोपाचे पात्र बनावे लागू शकते. तसेच भगवान विष्णू देखील क्रोधित होऊ शकतात. जे लोक तुळशीजवळ डस्टबीन ठेवतात, त्यांना लक्ष्मीची कृपाही मिळत नाही.