व्हिएतनाममधील एक व्यक्तीनं दफनभूमीतून मृत्यू झालेल्या पत्नीची हाडं काढून आणून त्याचा वापर करुन प्लॅस्टिकचा पुतळा बनवला. पत्नीच्या पुतळ्यासोबत तो गेली 17 वर्षे झोपतो.
ले व्हॅन यांचा त्यांच्या पत्नीसोबत 1975 मध्ये विवाह झाला. त्यानंतर त्यांना सात मुलं झालही होती. 2003 मध्ये व्हॅन घरापासून दूरवर काम करत असताना पत्नीच्या मृत्यूची बातमी समजली.
ले व्हॅन पत्नीच्या आठवणीत बराच वेळ दफनभूमीत पत्नीला दफन केलेल्या ठिकाणी जाऊन बसत असतं. पत्नीच्या थडग्यावर ते झोपत असतं. काही महिन्यानंतर खराब वातावरण आणि पावसाचा त्रास व्हायला लागल्यानं व्हॅन नाराज झाले.
व्हॅन यांनी पत्नीची हाडं आणून प्लास्टिकचा पुतळा तयार केला आणि घरात ठेवला. यामुळे घाबरलेल्या शेजाऱ्यांनी प्रशासनाकडं तक्रार केली.
व्हॅन यांनी त्यावर मार्ग काढण्यासाठी दफनभूमीमध्ये पत्नीच्या थडग्याभोवती आच्छादन टाकण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे ते त्यांच्या पत्नीच्या थडग्याशेजारी झोपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्या मुलांनी दफनभूमीत जाण्यापासून रोखलं.
प्रशासनानं त्यासंबंधी व्हॅन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. व्हॅन यांना मुलांनी दफनभूमीत जाण्यापासून रोखल्यानं त्यांनी एकेदिवशी पत्नीच्या थडग्यातून हाडं काढून आणली आणि पत्नीचा प्लॉस्टिकचा पुतळा बनवला.