मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ विजय हजारे करंडकात शानदार कामगिरी करतोय. पृथ्वीने विजय हजारे करंडक 2021 मध्ये 700 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या मोसमात त्याने 7 डावांमध्ये 4 शतक ठोकले आहेत. यापैकी पृथ्वीने 3 महत्वाच्या सामन्यात निर्णायक कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने आपल्या कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली.
विजय हजारे करंडकातील (vijay hazare trophy 2020 21) एकूण 8 सामन्यात मुंबईचा कर्णधार (prithvi shaw) पृथ्वी शॉने 827 धावा केल्या.
मुंबईने बाद फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर श्रेयस इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी अहमदाबादला निघून गेला. त्यामुळे पृथ्वीकडे या स्पर्धेतील कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. क्वार्टर फायनल सामन्यात मुंबईचा सौराष्ट्रसोबत आमनासामना झाला. या मॅचमध्ये पृथ्वीने 285 विजयी धावांचा पाठलाग करताना 123 चेंडूत 185 धावांची नाबाद खेळी केली.
पृथ्वी शॉ विजय हजारे करंडक 2021 (Vijay Hazare Trophy 2021) मध्ये सातत्याने शानदार फलंदाजी करत आहे. कर्नाटक विरुद्ध 165 धावांची खेळी करत पृथ्वीने मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) विक्रम मोडीत काढला आहे.