विनोद कांबळीची दुसरी पत्नी एंड्रीया हेविट, पूर्वी होती प्रसिद्ध मॉडेल आता काय करते ?
डावखुरा शैलीदार फलंदाज विनोद कांबळी आणि भारतरत्न मास्टल ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीस्मारकाच्या दादर येथील उद्घाटनाच्या वेळेचा व्हिडीओ पाहून अनेकजण हळहळले. विनोद कांबळीची अशी अवस्था पाहून अनेकांना वाईट वाटले..मैदानापेक्षा मैदानाबाहेरच जास्त चर्चेत राहिलेल्या विनोद कांबळी यांचे वैवाहीक जीवन देखील वादग्रस्त ठरले होते. त्याने दोन विवाह केले आणि त्याचे खाजगी जीवन देखील वादळी ठरले...