महाराष्ट्रात 2019 मध्ये तिकीट कापलं गेलेल्या नेत्याकडूनच भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर, कोण आहेत?

| Updated on: Mar 04, 2024 | 12:55 PM

भाजपकडून आज लोकसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्र्यांचीही नावं यामध्ये आहेत. भाजपची पहिली यादी महाराष्ट्रातील अशा नेत्याने जाहीर केली. ज्याचं 2019 ला तिकीट कापलं गेलं होतं.

1 / 5
आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारी करत आहे. अद्याप निवडणूकीच्या तारखी काही जाहीर झाल्या नाहीत. मात्र भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली आहे. अशातच शनिवारी भाजपकडून लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांची पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

2 / 5
भाजपने पहिल्या यादीमध्ये 196 उमेदावारांची नावं जाहीर केलीत. यामध्ये सोळा राज्यांचा समावेश आहे मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा यामध्ये समावेश नाही. महायुतीमुळे आता भाजप 48 पैकी किती जागा लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

3 / 5
महाराष्ट्रातील काही जागांवरून स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांमध्ये दोस्तीत कुस्ती होत असल्याचं दिसत आहे. आता वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपकडून पहिल्या यादीमध्ये 28 महिला, 34 केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांची घोषणा झाली आहे.

4 / 5
महाराष्ट्रातील नेत्याने भाजपच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा केली. याच नेत्याचं 2019 साली विधानसभा निवडणूकीचं तिकिट कापलं होतं. आता याच नेत्याने लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा केली.

5 / 5
भाजपचे हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून विनोद तावडे आहेत. 2014 ला भाजप सत्तेमध्ये आली तेव्हा विनोद तावडे शिक्षणमंत्री होते. मात्र त्यानंतर त्यांना विधानसभेचं तिकीट न दिल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.