लग्न हे सातजन्माचं बंधन मानलं जातं. लग्नं हे फक्त दोघांचंच नाही तर दोन कुटुंबाचं मिलन असतं. लग्नानंतर नवरा नवरीचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. पण जर हेच लग्नाचं पवित्र नातं तुटलं तर ही गोष्ट फक्त ऐकूनच वाईट वाटेल किंवा धक्का बसेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिनं तिचं लग्न मोडल्यानंतर चक्क मोठं सेलिब्रेशन केलं आहे.
या चर्चेत असलेल्या महिलेचं नाव आहे लॉरेन ब्रुक. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, लॉरेन ब्रुक ही महिला 31 वर्षांची आहे. लॉरेननं 2012 मध्ये लग्न केलं होते, परंतु 10 वर्षांतच तिचं नवर्यासोबतचं नातं तुटलं. विशेष बाब म्हणजे लॉरेन दोन मुलांची आई आहे.
सर्वात चकीत करणारी गोष्ट म्हणजे घटस्फोटानंतर लॉरेनने जे फोटोशूट केले, ते करण्यामध्ये तिच्या आईनेही तिला मदत केली आहे. तिच्या आईने हा क्षण लॉरेनसाठी आनंदाचा बनवला आहे. अमेरिकेत राहणारी लॉरेनने याबाबत सांगितलं की, हे फोटोशूट करताना ती अजिबात नाराज नव्हती, उलट दिवसभर ती पूर्णपणे आनंदात होती.
सध्या लॉरेनच्या या अनोख्या फोटोशूटची आणि घटस्फोटाची खूप चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
ज्यामध्ये लॉरेन तिच्या लग्नाचा पोशाख फेकताना आणि जाळताना दिसत आहे. सोबतच तिने लग्नाच्या फोटोचेही दोन तुकडे केले आहेत.
या महिलेने तिच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर म्हणजेच घटस्फोट घेतल्यानंतर तिने चक्क तिच्या लग्नाचा ड्रेस जाळला आहे. एवढंच नाही तर तिने या घटनेचे फोटोशूटही करून घेतले आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की ही महिला तिचा घटस्फोट झाल्याचा आनंद कशा प्रकारे साजरा करत आहे.